धनज बु. हे अमरावती जिल्ह्याच्या सिमेनजीक असलेले गाव असून, परिसरातील ग्रामस्थांसाठी कारंजाच्या तुलनेत अमरावतीची बाजारपेठनजीक असल्याने येथील ग्रामस्थ विविध व्यवहारांसाठी अमरावती येथून येजा करतात. त्यात अमरावती येथे कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू असून, या जिल्ह्यातील शेकडो नागरिक धनजमार्गेच वाशिम जिल्ह्यात दाखल होत असतात. त्यामुळेच कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळत असून, गेल्या १५ दिवसांत धनज बु. परिसरातील १५० पेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, गावागावात ग्रामस्थांची तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे. ०००००००००००००००० विलगीकरणातील व्यक्तींचा गावात संचार धनज बु.: कोरोना संसगार्चे निदान झालेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात राहण्याचे निर्देश प्रशासन आणि आरोग्य विभागाने दिले असताना परिसरात गेल्या काही दिवसांपासून विलगीकरणातील रुग्ण गावात फिरत असून, यावर नियंत्रणाची मागणी गावकºयांनी मंगळवारी केली.
-----------------
बाधितांच्या संपकार्तील व्यक्तीच्या माहितीचे संकलन
धनज बु.: येथून जवळच असलेल्या मेहा येथील तिघांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान सोमवारी झाले. त्यामुळे आरोग्य विभागाने या कोरोना बाधितांच्या संपकार्तील व्यक्तींच्या माहितीचे संकलन सुरू केले असून, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.