रिसोड : तालुक्यातील ग्राम वनोजाचे सरपंच जगदिशराव दिनकरराव देशमुख यांना तिन अपत्य असल्याचे कारणावरुन सरपंच व सदस्यत्वासाठी अपात्र ठरविल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी वाशिम यांनी १९ ऑगस्ट रोजी दिले आहेत.यासंदर्भात अधिक माहितीनुसार वनोजा येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच जगदिशराव दिनकरराव देशमुख यांना ग्राम पंचायत अधिनियमांतर्गत सदस्यत्वासाठी आवश्यक कालावधीत दोनपेक्षा जास्त अपत्य झाल्याने त्यांना सदस्यत्व व सरपंचदासाठी अपात्र घोषीत करण्याची मागणी करणारी याचिका वनोजाचे ग्रामपंचायत सदस्य प्रताप कैलासराव देशमुख यांनी अप्पर जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात दाखल केली होती. प्रतापराव देशमुख यांच्यातर्फे ही याचीका अप्पर जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात दाखल करताना अँड. पी. बी. बगडीया यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-१)व कलम १६ प्रमाणे गैरअर्जदार यांना अपात्र घोषीत करण्याची मागणी केली होती. त्यावरुन सुरु झालेल्या या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १९ ऑगस्ट २0१४ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात अर्जदार प्रताप कैलासराव देशमुख यांचा अर्ज मान्य करुन गैरअर्जदार जगदिशराव दिनकरराव देशमुख यांना वनोजा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यत्वासाठी अपात्र ठरविल्याचे आदेश दिले आहेत.
वनोजाचे सरपंच देशमुख अपात्र
By admin | Updated: September 3, 2014 00:52 IST