शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ निलंबित ग्रामसेवकांची होणार खातेनिहाय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:46 IST

दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आर्थिक गैरव्यवहार करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मारसूळ (ता.मालेगाव) व दापुरी खुर्द (ता.रिसोड) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना ४ फेब्रुवारीला निलंबित केले. दरम्यान, संबंधित दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत.१४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली मारसूळ येथील सरपंच, सचिवांनी लाखो रुपयांच्या निधीची अफरातफर केली. ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या रक्कमा स्वत:च्या नावे काढल्या. असे आरोप ठेवत ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांना निलंबित करण्यात आले; तर दापूरी खुर्द (ता.रिसोड) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक देवराव भगवान बोरकर यांनीही २ लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून त्यांनाही निलंबित करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असून संबंधित गटविकास अधिकाºयांनी आरोप प्रपत्र १ ते ४ तत्काळ सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

टॅग्स :washimवाशिम