शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सोयाबीन कुटाराची सकसता वाढविण्यासंदर्भात प्रात्यक्षिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:36 IST

वाशिम - सोयाबीनच्या कुटारावर युरियामिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल, यासंदर्भात आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली येथे सोमवारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला.

ठळक मुद्देसोयाबीनचे कुटार प्रामुख्याने चारा म्हणून उपयोगात आणले जात आहे.या कुटारावर युरियाची संपूर्ण प्रक्रिया केली तर जनावरांसाठी सकस आहार तयार होऊ शकतो. सोयाबीनच्या कुटारावर युरिया मिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - सोयाबीनच्या कुटारावर युरियामिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल, यासंदर्भात आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली येथे सोमवारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला.शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशूव्यवसायाकडे वळत आहेत. शेतीची वखरणी, डवरणी आदी कामे करण्यासाठीदेखी बैलांची गरज भासते. अलिकडच्या काळात जनावरांसाठी मुबलक प्रमाणात सकस चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांसमोर गैरसोयी निर्माण होत आहे. सोयाबीनचे कुटार प्रामुख्याने चारा म्हणून उपयोगात आणले जात आहे. या कुटारावर युरियाची संपूर्ण प्रक्रिया केली तर जनावरांसाठी सकस आहार तयार होऊ शकतो. यासंदर्भात अल्प शेतकºयांना माहिती असल्याने जनजागृतीचा एक भाग म्हणून आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जांभरूण महाली येथील रामेश्वर आत्माराम महाले यांच्या घरी सोयाबीनच्या कुटारावर युरिया मिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कृषीदूत सुमेध मनवर, देवीदास शिंदे, विठठ्ठल मांजरे, सागर कदम, सुमित भरगडे, प्रताप भालेराव आदी विद्यार्थ्यांनी यावेळी कुटारावर युरियाची संपूर्ण प्रक्रिया करून दाखविली. १० किलो कुटारावर ४०० ग्रॅम युरियाचे पाणी करून मिश्रण तयार करावे आणि लहान ताडपत्रीवर पसरवून, त्यानंतर जवळपास २० ते २१ दिवस ते दुसºया ताडपत्रीने झाकून ठेवायचे आहे, असे सांगितले. यामुळे सोयाबीन कुटार अधिक सकस होत असून, जनावरांसाठीही ते पोषक खाद्य ठरते असे उपस्थित विद्यार्थ्यांनी शेतकºयांना सांगितले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सातपुते, उपप्राचार्य डॉ. उलेमाले, कार्यक्रम अधिकारी प्रा. तापडीया, कार्यक्रम समन्वयक प्रा. देवकते, विषयतज्ञ प्रा. सोमटकर व अन्य प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवित असल्याने कृषिदूतांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती