निवेदन देताना मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे, जनहित कक्ष व विधि विभागाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. किशोर शिंदे, उपाध्यक्ष अॅड. पंकज फेदरे, विधि विभाग जिल्हा अध्यक्ष अॅड. नामदेवराव जुमडे, जनहित कक्ष व विधि विभागाचे अॅड. परमेश्वर शेळके, उपाध्यक्ष अॅड. संतोष इंगळे, अॅड. आशिष गहुले, अॅड. मनोज बोडखे, जिल्हा सचिव अॅड. मनोज राठोड, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जगताप, अॅड. अनंतराव वाघ, अॅड. ज्ञानेश्वर कऱ्हाळे, अॅड. विनोद सानप, अॅड. महिंद्रा भालेकर, अॅड. विष्णू गवळी, अॅड. भूषण साठे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील दोषी मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार व जिल्हा पोलीस अधीक्षकांचे तत्काळ ७ दिवसांच्या आत निलंबन करण्यात यावे. सदर प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी व त्याचा रिपोर्ट तत्काळ नोंदवून घेण्यात यावा. सदर रिपोर्टची कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी. असे न झाल्यास मनसे विधि विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
वरिष्ठ अधिवक्ता मारहाणप्रकरणी ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST