विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा या राज्यांना जोडणाऱ्या तथा सामाजिक दळणवळणाचा केंद्रबिंदू असलेल्या पॅसेंजर गाड्या व इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वे कोरोनामुळे ८ ते १० महिन्यांपासून बंद आहे. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विकासासाठी व आर्थिक व्यवहारांसाठी रेल्वे मुख्य साधन बनले आहे. परिसरातील लाखो लोकांचा व्यावहारिक संबंध परस्पर जिल्ह्यांमध्ये आहे. दररोजच्या दळणवळणातून कोट्यवधींची उलाढाल होत असते. ग्रामीण भागातील लोकांना अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी दवाखान्यात जावे लागते. रेल्वेची सुविधा स्वस्त आणि सुरक्षित असून इतर वाहनांनी प्रवास खर्चीक ठरत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, अॅड. नंदू पाटील, राऊत, आशिष ठाकूर, बदलाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST