शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीसाठी कासार समाजबांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:00 IST

वाशिम - ‘भटक्या जाती-ब’ या प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी कासार समाजबांधवांनी २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

 

वाशिम - ‘भटक्या जाती-ब’ या प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी कासार समाजबांधवांनी २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.कासार समाजबांधव राज्यभर विखुरलेल्या अवस्थेत असून, विकासापासून कोसोदूर आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कासार समाजाचा समावेश हा भटक्या विमुक्त जाती (भटक्या जाती-ब) प्रवर्गात करण्याची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. सध्या कासार समाज हा ओबीसी प्रवर्गात आहे. कासार समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जाती (भटक्या जाती-ब) प्रवर्गात करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ आॅगस्ट रोजी वाशिम येथे मोटारसायकलद्वारे मूकमोर्चा काढण्यात आला. सकाळी १०.३० वाजता कासार समाजबांधव श्री बालाजी संस्थान वाशिम येथे एकत्र आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून मूक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केला. त्यानंतर बसस्थानक चौक, सिव्हिल लाईनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जागतिक कासार समाज फाऊंडेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष तथा वाशिम येथील नेते राजेश्वर मोहिरे, सुधीर रंगभाळ, सुरेश खरावन, नितेश भिंगे, अ‍ॅड. वानरे, अनंता रंगभाळ, संतोष वाघ, उमाकांत शेंडे, वसंतराव खरावण, उमेश कथले, बालाजी वाघ, हेमंत रंगभाळ, बबन वाघ, सुनील महाजन, प्रवीण मुरकुंदे, विनोद रंगभाळ, संजय रंगभाळ, शंकर शेंडे, गोपाल रंगभाळ, प्रकाश महाजन, राहुल रंगभाळ, चेतन रंगभाळ, महाविर वाघ, ऋषिकेश रंगभाळ, शुभम मोहिरे, अ‍ॅड. राम महाजन, धनंजय हलगे यांच्यासह शेकडो समाजबांधव तसेच जागतिक कासार संघटनेच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय