वाकद येथील या फिडरमुळे गावातील काही भागांतील नागरिकांचे पंखे, कुलर, फ्रिज, आदी वस्तूंचे जादा भार आल्यामुळे नुकसान झाले आहे. होल्टेजचे प्रमाण कमी-जास्त होत असल्यामुळे अनेक वेळा नागरिकांना याचा त्रास सहन करून विद्युत उपकरणांना सुद्धा फटका बसत आहे. गावातील विद्युत कर्मचाऱ्यांना याबाबत अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केलेल्या आहेत. शिवाय ऑनलाईन तक्रारीसुद्धा चार वेळा केल्या आहेत. गावातील विद्युत कर्मचारी गावात उपस्थित राहत नसल्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घ्यावे लागते. या फिडरबाबत वाकद ग्रामपंचायतचे सरपंच अमोल देशमुख यांनी रिसोड येथील अभियंत्यांना याबाबत माहितीसुद्धा दिली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गावातील विद्युत ग्राहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित फिडरचे काम करून नवीन फिडर देण्याची मागणी बालाजी तिरके यांनी केली आहे.
वाकद येथील फिडर बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST