मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार वीज वितरण कंपनी अंतर्गत परिसरातील २८ गावे येत असून मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार होत आहे. वादळी पावसाने अनेकदा झाडाच्या वाढलेल्या फांद्या तुटून विजेच्या तारावर पडल्याने या तारा तुटून खाली पडतात. दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे विजेवर चालणारी सर्व यंत्रणा ठप्प होते. याशिवाय विजेच्या तुटलेल्या तारामुळे जीवितहानी होऊ शकते ही बाब सर्व जनतेसाठी धोकादायक आहे तसेच अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन या भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या कमी करणे, वीज बॉक्स दुरुस्ती करणे, वाकलेले खांब सरळ करणे आदी कामे मान्सूनपूर्व केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या विजेच्या समस्याला आळा घालणे सहज शक्य होते त्यामुळे या बाबीकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी कोठाळे, डोफेकर यांनी केली आहे. सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करून अखंडीत विद्युत पुरवठा राहील, असे शेलूबाजार शाखा अभियंता गोडबोले यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:43 IST