लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जिल्हयात जलयुक्त शिवाराची कामे मोठया प्रमाणात करण्यात आली. सदर कामांमुळे अनेक गावातील पाणी टंचाई दूर झाली, तर जलस्त्रोतात मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर भागात झालेल्या काही कामाची खोली कमी असल्याने मात्र सद्यस्थितीत नाल्यात पाणी नसल्याने या कामांची खोली वाढविण्याची मागण्ी या भागातील नागरिकांच्यावतिने केल्या जात आहे.शिरपूर परिसरात जलयुक्त शिवार कामांतर्गंत नाला खोलीकरणाचे काम मोठया प्रमाणात झाले आहे. या कामानंतर पावसाळयात त्या नाल्यात पाणी तुडूंब भरुन वाहत होते. एप्रिल महिन्यानंतर मात्र त्यामध्ये पाणी दिसून आले नाही. नाले कोरडे ठण्ण पडल्याने जलयुक्त शिवार अंतर्गंत करय्ण्यात आलेल्या नाला खोलीकरणाची शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कल्पना झाली. थोडे अधिक खोल असते तर आजपर्यंत यामध्ये पाणी शिल्लक राहीले असते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी संबधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून खोली कमी असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्याची मागणी शिरपूर भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
जलयुक्त शिवार कामाची खोली वाढविण्याची मागणी
By admin | Updated: May 22, 2017 18:58 IST