सदर हल्ल्यामध्ये गाडीचा ड्रायव्हर आणि गोपीचंद पडळकर यांना इजा होण्याची दाट शक्यता होती. सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. महाराष्ट्रात बहुजनांचा आवाज उठवणाऱ्या अशा नेत्यावर हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्रमध्ये अशोभनीय प्रकार असून, सदर हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल तथा भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सदर युवकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ओबीसी माेर्चाचे जिल्हाध्यक्ष संताेष मुरकुटे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष महादेव कुंडलिक ताथाेड, नगरसेवक राहुल तुपसांडे, गिरीश शर्मा, गणेश खंडाळकर, रितेश मलिक, धनंजय हेंद्रे, रामाभाऊ ठेंगळे आदींची उपस्थिती हाेती.
हल्ला करणाऱ्यास अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST