शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पळवून आणलेल्या चिमुकलीची सुटका

By admin | Updated: December 30, 2014 00:53 IST

रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ ; बुलडाणा येथील बाल सुधार गृहात रवानगी.

मलकापूर (बुलडाणा ) : रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे पुण्यावरून अज्ञात इसमांनी पळवून आणलेल्या आठ वर्षीय चिमुकलीची सुटका झाल्याची घटना आज २९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. सदर मुलीची रवानगी जिल्हा बाल सुधार विभाग बुलडाणा येथे करण्यात आल्याचे रेसुबच्या सूत्रांनी सांगितले.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात रेल्वे लाईनवरील खंबा नं.४९१/१0 जवळ एक मुलगी (वय ८) रडत असल्याची माहिती मिळाली. यावर रेसुबचे उपनिरीक्षक पी.के. गुज्जर यांच्या आदेशावरून आरक्षक दिलीप महाजन व रंजन तेलंग यांनी घटनास्थळ गाठले. सदर मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की झोपेत असताना रमेश नावाच्या इसमाने तिला पुण्यावरून मलकापूरला आणले. तुझी आई इथे आहे असे तिला सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्या मुलीने कशीबशी सुटका करून आईच्या शोधात ती रेल्वे लाईनने खामखेडकडे रडत निघाली होती. रेसुबच्या पोलिसांनी तिला जेवन देऊन जीआरपीचे आरक्षक बबन शिंदे यांच्या ताब्यात दिले. शहर पोलीस ठाण्यातील महिला शिपाई समवेत त्यांनी सदर मुलीस बुलडाणा येथील जिल्हा बाल सुधार विभागाकडे सुपूर्द केल्याची माहिती रेसुबचे अधीक्षक रंजन तेलंग यांनी दिली आहे.