शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर ...

पूर्वीच्या काळात जेव्हा विशेषत: ग्रामीण भागात कुठलेही दवाखाने नव्हते, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव होता, तेव्हा घरगुती उपचारांनीच विविध स्वरूपातील आजारांवर मात केली जात असे. स्वयंपाकात हळद, जिरे, लसूणाचा नियमित समावेश, हळद टाकून दूध पिणे, तुळस, दालचिनी, काळे मिरे आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यात टाकून उकळून घेतल्यानंतर त्याचा काढा करून पिणे, तीळ, नारळाचे तेल किंवा शुद्ध तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावणे, पुदिन्याची पाने किंवा ओवा एकत्रित उकळून घेतल्यानंतर पाण्याची वाफ घेणे, यासारख्या घरगुती तथा अत्यंत कमी खर्चातील उपचारांनी सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये वेदना होण्याचा त्रास दूर होतो, यावर आजही अनेकांचा दृढ विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लक्षणे आढळणाऱ्या अनेकांकडून यासारख्या घरगुती उपचारांचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण

३७९७१

कोरोनामुक्त रुग्ण

३३८०७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

३७५६

कोरोना मृत्यू

४०७

.................

कोट :

सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यास पुदिना झाडाची पाने आणि ओवा एकत्रित करून पाण्यात उकळून घ्यावा. तीन ते चारवेळा या पाण्याची वाफ घेतल्यास दोन्ही त्रास अल्पावधीतच दूर होतात.

- अनुसया संभाजी गरकळ

...............

कोरोना संसर्गामध्ये छातीत कफ होणे, घशात तीव्र वेदना होण्याची लक्षणे दिसून येतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी लवंग बारीक करून पावडर मध किंवा साखरेत मिश्रण करून घ्यावे. लवकरच आराम पडतो.

- बालिबाई रामधन राठोड

...............

तुळशीची पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे एकत्र करून त्याची पावडर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखी प्यायल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ताप, सर्दीतून यामुळे लवकर बरे होता येते.

- पवित्राबाई रामचंद्र मनवर

........................

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशाचा काय फायदा?

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत कफ दाटणे ही कोरोना विषाणू संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून अनेकवेळा स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ताप आल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस, एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा मध हे मिश्रण दिवसातून चारवेळा प्राशन केल्यास तापातून लवकर दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्दी झाल्यास अद्रक, काळे मिरे आणि तुळशीची पाने टाकून चहासारखे प्यावे. एक चमचा मध व अर्धा चमचा दालचिनीचे मिश्रण दिवसातून दोन ते तीनवेळा घ्यावे. लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या ठेचून त्याचे सेवन करावे, ओव्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन सर्दीतून लवकर दिलासा मिळविता येणे शक्य आहे.

खोकला आल्यास अद्रक पाण्यात उकळून ते पाणी कोमट असतानाच प्राशन करावे. एक चमचा अद्रकचा रस, एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि तीन चमचे मध हे मिश्रण दिवसातून तीनवेळा घेतल्याने खोकल्याच्या त्रासापासून लवकर सुटका करता येऊ शकते; मात्र सर्दी, खोकला आणि ताप अधिक प्रमाणात असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.

....................

कोट :

गुळवेल, गूळ, अद्रक, दालचिनी, लवंग, हळद आणि तुळशीची पाने एकत्र करून उकळून घेतल्यानंतर त्याचा एक कप काढा दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी, खोकला, तापातून बरे वाटण्यासह रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रीका यासारखे प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या काळात या घरगुती उपचारांवर प्रत्येकाने भर द्यायला हवा.

- डाॅ. बालाजी डाखोरे