शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कायमपट्टयाचा ठराव घेवूनही अंमलबजावणीत दिरंगाई; शिवसैनिकांसह झोपडपट्टीधारक आक्रमक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:40 IST

वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सदर प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी केली.माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात कारंजा शहरातील अतिक्रमणधारकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार राज्यातील सर्वच शहरातील अतिक्रमण घर, झोपडपट्टी धारकांना कायमपट्टे देण्याबाबतचा निर्णय २०१८ च्या मुंबई अधिवेशनात, महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयात झाला आहे. तसेच यासंदर्भात कारंजा नगरपरिषदेनेही २६ एप्रिल २०१८ रोजी ठराव घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीकरीता पत्र दिले आहे. परंतु यात दिरंगाई होत असल्याने हा प्रश्न रखडलेला दिसून येत आहे. कारंजा शहरात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अनेक गरीब कुटुंब अतिक्रमण झोपडीत वास्तव करीत असून नगरपरिषदेचा कर सुध्दा भरत आहेत. त्यांना कायम पट्टे मिळावेत म्हणून शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा सुध्दा करण्यात आला परंतु न्याय मिळाला नाही. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरीकरिता स्वताची जागा असल्याची अट घातली आहे. ाय योजनेपासून गरिब, अतिक्रमण घर, झोपडपट्टीधारक वंचित राहू नये म्हणून हे कुटुंब राहत असलेल्या जागेवर त्यांना कायमपट्टे देण्याची मागणी केली आहे. तसेच शासन निर्णयानुसार या अतिक्रमण धारकांना न्याय न मिळाल्यास या गरीब कुटुंबांना सोबत घेवून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा४शासन निर्णयानुसार अतिक्रमण धारकांना न्याय न मिळाल्यास या सर्व गरीब कुटुंबांना सोबत घेवून शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनासह चर्चेदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड यांनी दिला.४कारंजा नगरपरिषदेने यांसंदर्भात ठराव घेवूनही अंमलबजावणीला दिरंगाई केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमShiv SenaशिवसेनाWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय