वाशिम - उन्हाळयाची चाहूल लागल्याबरोबर शहरात विविध ठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्यावतिने पाणपोई उभारुन तहानलेल्यांना पाणी देण्याचे महान कार्य केल्या जात होते, यावर्षी पाणपोर्इंच्या संख्येत मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे.वाशिम शहरातील मुख्य चौक पाटणी चौक, शिवाजी चौक, बसस्थानक चौक, रिसोड नाका यासह ईतर भागात विविध संघटना दरवर्षी पाणपोई उभारुन नागरिकांना पाण्याची व्यवस्था निर्माण करुन देते. यावर्षी शहरात मारवाडी युवा मंच यांच्यासह एखादया संघटनेने पाणपोई उभारली असून ईतर ठिकाणी मात्र कुठेही पाणपोई दिसून येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात आल्यानंतर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
सार्वजनिक पाणपोर्इंच्या संख्येत मोठया प्रमाणात घट
By admin | Updated: April 12, 2017 13:45 IST