शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्यासंदर्भात पंचायत समितीने घेतला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:48 IST

पांगरी महादेव या गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव  मंगरूळपीर पंचायत समितीने २७ सप्टेंबर रोजी घेतला.

ठळक मुद्देशासनाच्या कोणत्याच वैयक्तिक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. अद्याप कुणीच याची दखल घेतली नसल्याने गावकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातून सन २००३ मध्ये मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ झालेल्या; परंतू कोणत्याही ग्रामपंचायतला जोडण्यात न आलेल्या पांगरी महादेव या गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव  मंगरूळपीर पंचायत समितीने २७ सप्टेंबर रोजी घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, उपसभापती सुभाष शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.पांगरी महादेव ता. मंगरूळपीर या दुर्गम भागात वसलेल्या गावाला कोणत्याही ग्रामपंचायतशी जोडण्यात आले नसल्याने शासनाच्या कोणत्याच वैयक्तिक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. सन २००३ पासून अशी परिस्थिती असतानाही अद्याप कुणीच याची दखल घेतली नसल्याने गावकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ झाल्यानंतर पांगरी महादेव येथील मतदार हे  पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदान करतात. परंतू, फक्त ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यामुळे किंवा इतर कुठल्याही ग्रामपंचायतला सदर गाव न जोडल्यामुळे शासनाच्या आवास योजनेचा तसेच विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ आजपर्यंत ग्रामस्थांना मिळाला नाही.  सन २०११ मध्ये गावात सामाजिक, आर्थिक जनगणना झाली असून, प्रधानमंत्री आवास योजनेचा कोणताही लाभ गावाला मिळाला नाही, असे सांगत पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव राठोड यांनी २७ सप्टेंबरला पंचायत समिती पदाधिकारी तसेच गटविकास अधिकाºयांना निवेदन देत ग्रामस्थांच्या समस्या  निकाली काढण्याची मागणी केली. या निवेदनाची दखल घेत २७ सप्टेंबरला पंचायत समितीच्या मासिक सभेत पांगरी महादेव गावासंदर्भात चर्चा झाली. शेवटी सर्वानुमते पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा ठराव मंजूर करीत सदर ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत