शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्कयाने रिधोरा येथील युवकाचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2014 01:52 IST

१९ वर्षीय युवकाचा वीज धक्याने मृत्यु झाल्याची घटना

रिधोरा : गावाच्या पुर्व दिशेला असलेल्या शेतशिवारात १९ वर्षीय एकनाथ दत्तराव कव्हर याचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी दूपारी १२ वाजताचे सुमारास घडली. दत्तराव कव्हर व त्यांचे कुटूंब गावातीलच डॉ. चंद्रप्रकाश घुगे यांचे शेत नेहमीच बटईने करतात. ३0 ऑगस्ट रोजी सकाळी दत्तराव कव्हर आपला मुलगा एकनाथ याचेसह शेतात फवारणीसाठी गेले होते. दूपारी १२ वाजताचे सुमारास अचानक शेतात जमीनीवर तूटून पडून असलेल्या विजेच्या प्रवाहीत तारांना एकनाथचा स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच गावकर्‍यांच्या मदतीने एकनाथला तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतू तीथे डॉक्टरांनी त्यालाम मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता इंगळे, लाईनमन वायचाळ आदी घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी पंचनामा व इतर सोपस्कारही पार पाडले. रिधोरा शेतशिवारात विज असते केव्हा हा प्रश्न उपस्थित होत असतांना विजेच्या धक्कयामुळे एका मुलाला आपल्या जीवास मुकावे लागल्याने वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत ग्रामस्थांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी वीज पुरवठय़ाची पध्दत व पावसाळ्य़ाचे दिवस पाहता तारांच्या दूरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असते तर असे घडलेच नसते असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. गत पंधरवड्यात मेडशी येथे दोन म्हशी, राजूरा येथे एक म्हैस विजेच्या धक्कयाने मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी एकनाथला विजेचा धक्का बसला त्याठिकाणी याआधी एक हरिण व एका मुंगूसाला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ज्या भागात एकनाथ कव्हर या मुलाचा विजेचा धक्कयाने मृत्यू झाला, त्या भागातील वीज पूरवठय़ाला अर्थींगच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.