लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : परिवहन महामंडळाच्या धावत्या बसचा धक्का लागल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, एमएच ४0 वाय ५१0२ या क्रमांकाची अमरावती-वाशिम ही एस.टी. बस नेहमीप्रमाणे सकाळी ७.३0 वाजतादरम्यान मंगरूळपीर येथील अकोला चौकातून जात असताना, एका अनोळखी इसमाला बसचा धक्का लागला.यामध्ये सदर इसमास खाली कोसळला आणि त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदश्रींनी दिली. यादरम्यान घटनास्थळावर बघ्यांची तोबा गर्दी झाल्याने वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी बसचालक रामविलास फनुसिंग जाधव (रा.कारंजा लाड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखला केला आहे.पुढील तपास मंगरुळपीर पोलिस करीत आहेत.
बसच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST
परिवहन महामंडळाच्या धावत्या बसचा धक्का लागल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगरूळपीर येथील अकोला चौकात रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
बसच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
ठळक मुद्देमंगरूळपीर येथील घटना चालकाविरूद्ध गुन्हा दाखल