मंगरूळपीर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिम व पंचायत समिती मंगरूळपीरद्वारे १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत बचत गटातील महिलांसाठी दशसूत्री पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योजनेमध्ये तालुक्यातील बचत गटात कार्यरत असलेल्या २0 महिलांची समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून नियुक्ती यंत्रणेमार्फेत करण्यात आली होती. स्वयंसहाय्यता बचत गटांना सक्षम करण्याच्या हेतूने नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना दशसूत्री पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील ग्राम पोटी येथील ग्रामपंचायत सभागृहात पं.स.विस्तार अधिकार भावराव बेल खेडकर यांनी त्यांचे सहकारी अधिकार्यांसह ३ दिवशीय कार्यक्रम आयोजित केले होते. पहिल्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिलांचा परस्पर परिचय व प्रशिक्षणामागील प्रशासकीय उद्देश या विषयासह अनेक विषयावर सामुहिक चर्चा, योजनेपासुन वंचित घटक, बचत कशी करावी परस्पर संपर्क इतर बचत गटांना मार्गदर्शन कसे करावे, आर्थिक समावेशन दुसर्या दिवशी अं र्तगत कर्ज वितरण, कर्ज परत फेड, गटांचे लेखे आरोग्याची काळजी, शिक्षणविषयी जनजागृ ती, पंचायत राज संस्था व शाखात उपजिवीका तर तिसर्या दिवशी राष्ट्रीय व ग्रामीण जीवनोन्नती अभियान परिचय अभिरूप बैठक स्पर्धा या विषयावर विस्तार अधिकारी बेल खेडकर ,अतिश राठोड, सारीका उबले, ङ्म्रध्दा चक्रे यांनी उपस्थीत प्रशिक्षणार्थींना समायोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन भावराव बेलखेडकर तर आभारप्रदर्शन अनिता वाघमारे यांनी केले.
बचत गटातील महिलांना दशसूत्री पायाभूत प्रशिक्षण
By admin | Updated: September 7, 2014 03:03 IST