शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:25 IST

सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्यात आलेल्या संततधार पावसामुळे १५ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.वाशिम जिल्ह्यात २.९३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. हे पीक २० ते २५ दिवसाचे झाल्यानंतर यावर उंटअळी, चक्रीभुंगा, खोडमाशी या किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर १० आॅगस्टपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व संततधार पाऊस पडल्याने सोयाबीन पिकावर खोडावरील, शेंगावरील करपा रोग, तसेच पाने पिवळी पडण्याचे प्रकार दिसून आला. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशी नाशकाची फवारणी करण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. त्यानंतरही सततच्या पावसामुळे तब्बल १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. उर्वरीत सोयाबीन पिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात यंदा ६६४३ हेक्टर क्षेत्रावर मुग पिकाची पेरणी झाली. या पिकाच्या शेंगा परिपक्व होत असतानाच पावसाने रिपरिप सुरू केली. त्यामुळे शेंगामध्ये कोंब फुटून या पिकाचा दर्जा खालावला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सततच्या पावसामुळे एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील अर्थात २ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील मुग पिकाचे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात ९५४३ हेक्टर क्षेत्रावर उडिद पिकाची पेरणी झाली असताना आणि हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळुन आला. त्यात १० आॅगस्टपासून आलेल्या संततधार पावसामुळे जवळपास १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील उडिद पिकाला फटका बसला.यंदा आॅगस्ट महिन्यात १० तारखेपासून पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना प्रामुख्याने सोयाबीन, उडिद आणि मूग पिकाला फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तिन्ही पिके मिळून जवळपास १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती