धनज मंडळाअंतर्गत येणाऱ्या राहाटी, हिंगणवाडी, आंबोडा, रामटेक, धनज खुर्द, भिवरी, धनज बु , सिरसोली या नदीकाठीवर असलेल्या गावातील शेतीत पावसाचे पाणी शिरले. सोयाबीन, तूर, उडीद , मूग, ऊस व फळबागा या पिकांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आला असला तरी कारंजा तालुक्यात पावसाचे प्रमाण मात्र कमी होते. त्यामुळे जलस्तोत्राच्या पाणी पातळीतही अपेक्षित वाढ झाली नव्हती. परंतु पोळ्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत १२० मिमी एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, नाले ओसंडून वाहू लागले. त्यामुळे बेबळा नदी काठीवरील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तसेच बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे बेंबळा नदी ओसंडून वाहत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेताची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.