शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

महावितरणच्या "नवप्रकाश"ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!

By admin | Updated: April 18, 2017 19:34 IST

वाशिम- महावितरणच्या "नवप्रकाश" योजनेला ग्राहकांमधून फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक मेश्राम यांनी मंगळवारी दिली.

वाशिम : विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने नवप्रकाश योजना अंमलात आणली असून त्यास जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असताना या योजनेला ग्राहकांमधून फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक मेश्राम यांनी मंगळवारी दिली.वाशिम जिल्ह्यात महावितरणचे २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक असून घरगुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. एप्रिल २०१७ पर्यंत त्यातील ३० हजारपेक्षा अधिक ग्राहकांकडे १७ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. त्यांनी नवप्रकाश योजनेचा लाभ घेवून देयकातून मुक्त व्हावे, यासाठी महावितरणचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ग्राहकांनी या योजनेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. नवप्रकाश योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्या मूळ देयकाच्या रकमेत ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या घरगुती ग्राहकांसाठीच ही योजना लागू आहे. महावितरणकडून योजनेची प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे. एवढेच नव्हे; तर आधी ३० एप्रिल २०१७ पर्यंत ही योजना लागू होती. त्यास जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याऊपरही योजनेला विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी सांगितले.