शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांमध्ये गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:58 IST

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याचे १५ मे रोजी दिसून आले. 

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाल्याने ५ मे रोजी बहुतांश दुकाने, प्रतिष्ठाने पूर्ववत झाली आहेत. परंतू, दुकानांमध्ये तसेच दुकानांसमोर ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याचे १५ मे रोजी दिसून आले.  राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने हाहा:कार माजविला आहे. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. वाशिम जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने लॉकडाउन व संचारबंदीतून दुकाने, प्रतिष्ठानांना बºयापैकी सुट मिळालेली आहे. केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, चहा व पानटपº्या, उपहारगृह, ढाबे, सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, बार आदी बंद ठेवून जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, कापड दुकान यासह अन्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्यास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून सुट देण्यात आलेली आहे.  परवानगी दिलेल्या आस्थापना, दुकाने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक असून याकरिता आस्थापना, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारक, दुकानदारांवर सोपविण्यात आली तसेच दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घ्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी म्हणून वाशिम शहरातील काही दुकाने, आस्थापनांमध्ये पाहणी केली असता, दुकानांमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्या तसेच दुकानांसमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंगही करण्यात आली नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रूग्ण नसला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे दुकान, आस्थापनांमध्ये होणारी गर्दी टाळणे आवश्यक ठरत आहे. दुकानांमध्ये गर्दी होणार यादृष्टिकोनातून प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिम