शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांत लसीकरणासाठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

राज्यभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, दमा, उच्च रक्तदाबासह इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना ...

राज्यभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, दमा, उच्च रक्तदाबासह इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना त्यामुळे असलेला धोका लक्षात घेत आरोग्य विभागाने १ मार्चपासून शासकीय केंद्रात मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सहा शासकीय रुग्णालयांत ही मोहीम राबविली जात आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारग्रस्तांची मोबाईल अ‍ॅपसह प्रत्यक्ष केंद्रांवर नोंदणी केली जात असून, या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मंगळवारी शासकीय रुग्णालयात लस टोचून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. तथापि, या ठिकाणी योग्य नियोजनच केले नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

--------------------

सूचनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली. त्यासाठी जिल्ह्यातील सहा शासकीय केंद्रांवर व्यवस्थाही केली असून, कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे असताना त्याचेच पालन नागरिक करत नसून, प्रशासनाने लसीकरण केंद्रांवर सूचना फलक लावल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा अर्थच काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

-------------

लसीकरण कक्षापुरतीच मास्कची तसदी

कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग जेवढे महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा अधिक तोंडाला मास्क लावणे महत्त्वाचे आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभाग आणि प्रशासन जनजागृती करत असून मास्क न लावणाऱ्या लाखो लोकांवर दंडात्मक कारवाईसुद्धा वर्षभरात करण्यात आली असताना प्रत्यक्ष कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास आलेल्या काहींनी प्रत्यक्ष लसीकरण कक्षात जाताना तंबी दिल्यामुळेच मास्क लावल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

---------------

कोट :

जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारग्रस्तांना मोफत लस दिली जात आहे. त्यासाठी रितसर नोंदणी सुरू असून, केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी सुरक्षा रक्षकही नियुक्त केले आहेत. तथापि, काही मंडळी फिजिकल डिस्टन्सिंगबाबत गंभीर नसल्याने कठोर उपाय करण्यात येतील.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

पहिल्या दिवशी झालेले लसीकरण

१) जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम ९२

२) उपजिल्हा रुग्णालय, कारंजा २७

३) ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर ५५

४) ग्रामीण रुग्णालय, रिसोड ४३

५) ग्रामीण रुग्णालय, मालेगाव २१

६) ग्रामीण रुग्णालय, मानोरा २३