शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पिककर्ज वाटपास प्रारंभ; ७१७ सभासदांना ६ कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:34 IST

कारंजा :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करीता पिककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला असून कारंजा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ शाखांमधील ७१७ सभासदांना ५ कोटी ९९ लाख ९ हजार रूपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात पात्र सभासद शेतकºयांना १६ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता पिककजार्चे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर पाटील कानकिरड , बँकेचे वरीष्ठ निरीक्षक डी. एम . वानखडे, धनज शाखा निरीक्षक एम .आर. महल्ले, कामरगाव शाखा निरीक्षक पी. एन .जाधव, कारंजा शाखा निरीक्षक जी. डी .उजाडे, एस .बी .देशमुख व उंबडार्बाजार शाखा निरीक्षक बी. एस. मोहीते यांच्यासह बँक कर्मचाºयांची व पात्र सभासद शेतकºयांची उपस्थिती होती. कारंजा तालुक्यात कारंजासह कामरगाव, मनभा, उंबडार्बाजार, काजळेश्वर, पोहा व धनज अशा ७  ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे पसरले असून स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पात्र श्ोतकरी सभासदांना दरवर्षी खरीप पिककजार्चे वाटप करण्यात येते. अध्यापपर्यंत दुसºया एकाही बँकेने पिककजार्चे वाटप न केल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पात्र शेतकरी सभासदांना पिककर्ज वाटप केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयातून उमटत आहे. खरीप पिककर्ज वाटपात पारदर्शकता यावी या उद्देशाने पिककजार्चे वितरण हे एटीएम कार्डद्वारे करण्यात येते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एटीएम कार्ड येण्यास उशिर झाल्याने पिककजार्तील अर्धी रक्कम सभासद शेतकºयाच्या बचत खात्यात वळती करण्यात आल्याने ऐन गरजेच्यावेळी पैसा कामी पडल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान स्पष्टपणे झळकत होते. आतापर्यंत एकुण ६६१  सभासदांना एटीएम कार्ड प्राप्त झाले असून एटीएम कार्डद्वारे शेतकºयांनी पिककजार्ची रक्कम काढणे सुरू केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील आतापर्यंत ७४ टक्के कर्ज वसुली केली आहे. तर काही शेतकºयांची कर्जमाफी झाल्याने ते शेतकरी सुध्दा नवीन पिककर्ज घेण्यास पात्र ठरले आहे. एकंदरीत ऐन अडचणीच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतीमशागतीच्या दृष्टीने  पिककर्जवाटप केल्याने शेतकºयातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrop Loanपीक कर्ज