शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 12, 2015 02:03 IST

अवकाळी पाऊस व गारपीट ; मानोरा तालुक्यातील ३२0 घरांची पडझड

वाशिम : जिल्हय़ात ९ मार्च रोजी वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर ३२0 घरांची पडझड झाली. जिल्हय़ातील मालेगाव व रिसोड वगळता उर्वरित चारही जिल्हय़ांमध्ये हे नुकसान असून, या तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. ९ मार्च ते १0 मार्च सकाळपर्यंत जिल्हय़ात सरासरी २७.५७ मि.मी. पावसाची तर ११ मार्च रोजी मालेगाव व रिसोड येथेच ३.१७ सरासरी पावसाची नोंद आहे. मालेगावमध्ये ७ मि.मी. तर रिसोड मध्ये १२ मि.मी. पाऊस पडला. या अवकाळी पावसासहच कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हय़ात ९ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये गहू या पिकाचे वाशिम तालुक्यात १२0 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात २९00 हेक्टर, मानोरा तालुक्यात ३१९0 हेक्टर, कारंजा तालुक्यात २३९0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच वाशिम तालुक्यात हरभरा पिकांचे २५0 हेक्टर, मंगरूळपीर २५00 हेक्टर, मानोरा २५0१ हेक्टर व कारंजा तालुक्यात २५१0 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. फळपिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील ३00 हेक्टरवरील तर इतर पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील २00 व कारंजा तालुक्यातील ४३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्हय़ात गव्हाचे ८६00, हरभरा ७७६१ , फळपिकाचे ३00 तर इतर ६३७ असे एकूण १७२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची माहिती मागविली आहे.