शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

उन्हाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतरही परतीचा पाऊस ...

उन्हाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतरही परतीचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा होता. मात्र, सिंचनासाठी पाण्याचा बऱ्याच प्रमाणात उपसा झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट आली. पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे कृती आराखडा तयार केला जातो. या वर्षीच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली असून, ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात हातपंप बंद असल्यानेही नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वाशिम तालुक्यासह रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याने, प्रस्तावित उपाययोजनांची आतापासूनच प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनातर्फे चाचपणी सुरू आहे. टँकरचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून प्राप्त नसल्याने, सध्या जिल्ह्यातील एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील २२ गावांमध्ये एप्रिल ते मे या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, प्राप्त प्रस्तावानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी, कवठा, भर जहाँगीर परिसर, वाशिम तालुक्यातील काटा, तामसाळा आदी परिसरातही पाणीटंचाईची तिव्रता अधिक असते. यंदाही या परिसरात पाणीटंचाईचे संकट घोंघावत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा गावकरी बाळगून आहेत. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी २८३ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर, अनेक ठिकाणी ‘विहीर अधिग्रहण’ असा फलकही संबंधित विहीर परिसरात लावण्यात येत नाही. त्यामुळे कोणत्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले, याची माहिती संबंधित गावातील नागरिकांना मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी विहीर अधिग्रहण केल्यानंतर तेथे फलक लावण्यात यावा, असा सूरही ग्रामीण भागातून उमटत आहे.

.........

बॉक्स

पाणीटंचाई आराखडा मंजूर

जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाईची तीव्रता असलेल्या गावांमध्ये प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. ४२२ उपाययोजनांवर चार कोटी ९० लाख १७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

००००

बॉक्स

सद्यस्थितीत एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही

जिल्ह्यातील २२ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत एकाही ठिकाणावरून टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. प्राप्त प्रस्तावानुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

०००

बॉक्स

६७ ठिकाणी नवीन कूपनलिका

पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यात ६७ ठिकाणी नवीन कूपनलिका घेण्याचे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. शक्यतोवर मार्चअखेरीस किंवा एप्रिल, मे महिन्यात नवीन कूपनलिका घेण्यात येतील.

००

बॉक्स

विहिरी अधिग्रहणासाठी चाचपणी

पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील २८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करू शकेल, अशा विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिरीतून वैयक्तिकरीत्या पाणी घेण्यास मनाई केली जाणार असून, या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

०००

जिल्ह्यातील एकूण गावे - ७९१

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - ३९२

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ००

विहिरींमधील गाळ काढला जाणार - ००

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - ६७

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती होणार - ४२