वाशिम : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी कोरोनावरही सहज मातही केली. परंतु, कोरोनानंतर रुग्ण, नागरिकांवर म्युकरमायकोसिसचे (बुरशीमुळे होणारा आजार ) नवे संकट उभे ठाकले असून, जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालय तसेच इतरही खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून, जवळपास ९० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाºया या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. म्युकरमायकोसिसमुळे ११ मे रोजी जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, यासंदर्भात खासगी कोविड व अन्य रुग्णालयांकडून आढावा घेतला असता, जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफील राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे.
कोरोनानंतर रुग्णांवर म्युकरमायकोसिसचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:40 IST
Mucormycosis : रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
कोरोनानंतर रुग्णांवर म्युकरमायकोसिसचे संकट
ठळक मुद्देखासगी दवाखान्यांत आढळताहेत रुग्ण आरोग्य विभागाकडून घेतली जातेय माहिती