शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पाऊस आल्यास थांबतात मृतदेहांवरील अंत्यसंस्कार ; ४१ वर्षांपासून स्मशानभूमीला नाही शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:10 IST

कारंजा लाड (वाशिम) : धरणासाठी जमिनी देवून भुमिहिन झालेल्या गावकºयांचे ४१ वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. गावाशेजारी स्मशानभूमीसाठी एक हेक्टर जमिनही मिळाली. मात्र, तेव्हापासून आजतागायत या स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्की वाट तयार झाली नसून स्मशानभूमीत टिनशेड उभारल्या गेले नाही.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट या खेडेगावात उद्भवलेल्या या समस्येमुळे गावकरी पुरते हैराण झाले आहेत.२० जून रोजी जोरदार पाऊस झाल्याने रात्रभर मृतदेह घरात ठेवण्याची वेळ एका कुटूंबावर ओढवली. त्याठिकाणी मृतदेह घेवून जाण्यासाठी पक्क्या रस्त्याअभावी जणू तारेवरची कसरत करावी लागते.

कारंजा लाड (वाशिम) : धरणासाठी जमिनी देवून भुमिहिन झालेल्या गावकºयांचे ४१ वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. गावाशेजारी स्मशानभूमीसाठी एक हेक्टर जमिनही मिळाली. मात्र, तेव्हापासून आजतागायत या स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्की वाट तयार झाली नसून स्मशानभूमीत टिनशेड उभारल्या गेले नाही. परिणामी, दरवर्षी साधारणत: जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यात कधीही पाऊस कोसळल्यास मृतदेहांवरील अंत्यसंस्कार अनिश्चित काळासाठी थांबतात. कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट या खेडेगावात उद्भवलेल्या या समस्येमुळे गावकरी पुरते हैराण झाले आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंप्री फॉरेस्ट या गावात सुसज्ज स्मशानभूमीअभावी मोठ्या स्वरूपातील अडचणी उद्भवणे सुरू झाले असून २० जून रोजी जोरदार पाऊस झाल्याने रात्रभर मृतदेह घरात ठेवण्याची वेळ एका कुटूंबावर ओढवली. यासंदर्भात गावचे उपसरपंच दिलीप पवार यांनी सांगितले, की गावात गेल्या ४१ वर्षांपासून स्मशानभूमीवर शेड उभारल्या गेले नाही. त्याठिकाणी मृतदेह घेवून जाण्यासाठी पक्क्या रस्त्याअभावी जणू तारेवरची कसरत करावी लागते. अडान हा मध्यम प्रकल्प उभारताना गावचे सन १९७७ मध्ये पुनर्वसन झाले. त्यावेळी स्मशानभूमीसाठी १६, १७ आणि १८ गटातील १ हेक्टर ई-क्लास जमिन मिळाली. मात्र, त्याठिकाणी अद्याप सुसज्ज स्मशानभूमी उभी झालेली नाही. त्यामुळे गावात कधी कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसस्कार करण्यादरम्यान पावसाने हजेरी लावल्यास पाऊस थांबेपर्यंत मृतदेह घरांमध्येच ठेवावे लागतात. विशेष गंभीर बाब म्हणजे मृतदेह जाळण्यासाठी ठेवण्यात आलेले लाकडी इंधन पावसाने ओले झाले की मृतदेह पूर्णत: जळत नाहीत. दरम्यान, गावात २० जून रोजी दोन व्यक्तींचे निधन झाले. त्यापैकी एकावर दुपारी, तर दुसºया वृद्ध महिलेवर सायंकाळी अंत्यसस्कार होणार होते. मात्र, प्रेत स्मशानभुमित नेण्याची तयारी सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाईलाजास्तव अंत्यसंस्कार थांबवून दुसºया दिवशी ते उरकण्यात आले. या समस्येमुळे बाहेरगावहून आलेले नातेवाईक व गावकºयांची प्रचंड गैरसोय झाली. दरवर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणारी ही समस्या विनाविलंब निकाली काढण्याची मागणी गावकºयांमधून होत आहे. 

...अन्यथा शासनदरबारी करणार मृतदेहांवर अंत्यसंस्कार!ज्या गावकºयांनी आपली नदीकाठची सुपीक जमीन ४१ वर्षांपूर्वी शासनाला अल्प दरात बहाल केली व आपले मुळ गाव सोडून दुसºया ठिकाणी संसार वसविला, त्यांच्यावर शासन व लोकप्रतिनिधींच्या अवकृपेने मरणोपरांतही संकट कोसळत आहे. अशाप्रकारे मृतदेहांची देखील विटंबना नशीबी ओढवली आहे. या समस्येबाबत शासनाकडे अनेकवेळा तक्रार केली; पण त्याची दखल झाली नाही. त्यामुळे यापुढे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर शासनदरबारी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्धार गावकºयांनी केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा