शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

कालबद्ध कृती आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST

.................... वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा वाशिम : महावितरण कंपनीअंतर्गत घरगुती, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठी विजेचा वापर करणाऱ्या ...

....................

वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा

वाशिम : महावितरण कंपनीअंतर्गत घरगुती, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठी विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडे देयकांची थकबाकी ६२ कोटींवर पोहोचली आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी केले.

...............

पोस्टर स्पर्धेत रोशन बाजड प्रथम

वाशिम : लायन्स क्लबच्यावतीने गुरूवारी आयोजित केलेल्या व्यसनमुक्त पोस्टर स्पर्धेत रोशन बाजडने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय विश्वजा देशमुख, तर तृतीय क्रमांक कीर्ती बकाल या विद्यार्थिनीने प्राप्त केला.

.............

जऊळका येथे गायनाचा कार्यक्रम

जऊळका रेल्वे : मालेगाव तालुक्यातील ग्राम जऊळका रेल्वे येथे अष्टशिल गायक मंडळातर्फे बुधवारी भीमगीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कलावंतांनी विविध गीते सादर केली.

......................

कर्मचाऱ्यांना घ्यावे लागते विकतचे पाणी

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

...............

ग्रा.पं.मध्ये पार्किंग सुविधेचा अभाव

किन्हीराजा : ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार्किंग सुविधेचा अभाव आहे. यामुळे वाहने कुठेही आणि मन मानेल त्या पद्धतीने उभी केली जातात. याकडे लक्ष देण्याची मागणी मंगेश आढाव यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली.

..............

सोयाबीनच्या दरात वाढ

किन्हीराजा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सध्या ४००० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.

..............

कार्यक्रम सुरू झाल्याने कलावंतांची सोय

मेडशी : कोरोना काळात समाज प्रबोधनाचे कार्यक्रम थांबले होते. यामुळे रानोमाळ भटकून पोटाची खळगी भरणाऱ्या कलावंतांवरही उपासमारीची वेळ ओढवली होती. आता कार्यक्रम सुरू झाल्याने कलावंतांची सोय झाली असून, मेडशी येथे गुरूवारी कलावंतांनी कार्यक्रम सादर केला.

..............

प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन

वाशिम : खासगी वाहनांव्दारे ग्रामीण भागात प्रवास करीत असलेले अनेकजण खबरदारी बाळगत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

.............

वाहतूक सुरळीत करण्याची मागणी

वाशिम : शहरातील पाटणी चौक व रिसोड नाका येथे दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. त्याचा रहदारीलाही अडथळा निर्माण होत असून, ही समस्या सोडविण्याची मागणी गणेश मुळे यांनी बुधवारी पोलिसांकडे केली.

...................

ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

मालेगाव : तालुक्यातील गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले आहे.