शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

शहर स्वच्छतेसाठी नगरसेवकाचा पुढाकार

By admin | Updated: June 2, 2017 15:39 IST

विरेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाºयांपुढे आदर्श ठेवला आहे. 

जनतेसमोर आदर्श: मंगरुळपीर पालिकेचे गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांचा उपक्रम मंगरुळपीर ; तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर साफसफाईची कामे करण्याची मागणी शहरातील जनतेकडून जोर धरत असताना मंगरुळपीर येथील नगरसेवक तथा भाजप गटनेते विरेंद्रसिंह ठाकूर यांनी पालिका प्रशासनाच्या तयारीची प्रतिक्षा न करता आपल्या प्रभागात स्वत:च नाली सफाईचे काम करून जनतेसह पालिका कर्मचाऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. अलिकडच्या काळात सत्तेत असो वा विरोधी बाकावर, लोकप्रतिनिधी केवळ सल्ला देऊन मोकळे होणे आणि सभा बोलावून आपल्या कामांची बतावणी करण्यापलिकडे फारसे काही करण्यात उत्साही नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विरोधात असताना सत्ताधारी गटाच्या धोरणाबाबत आरडाओरड करणे किंवा प्रशासनाच्या चुकांचा पाढा वाचणे, हे प्रकारही पाहायला मिळतात; परंतु अधिकार आणि पदाची दुसरी बाजू कर्तव्य आहे, याचा मात्र लोकप्रतिनिधींना पद्धतशीर विसर पडला असतो. याला काही अपवादही आहेत. त्यामध्ये मंगरुळपीर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा विद्यमान नगरसेवक विरेंद्रसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांत मंगरुळपीर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानंत प्रचंड निराशा आणि रोषाचे वातावरण आहे. त्यात पावसाळा तोंडावर असताना पालिका प्रशासनाने संभाव्य रोगराईला आवर घालण्यासाठी मान्सूनपूर्व कामे करणे गरजेचे आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग साफ करणे, नाल्या उपसणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य लाभण्याचे आवाहन करणे, आदिंचा प्रामुख्याने समावेश होतो; परंतु मंगरुळपीर शहरात ३१ मेपर्यंतही त्याला प्रारंभ झाला नसल्याने पालिका प्रशासनासह त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यतत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशात विरेंद्रसिंह ठाकूर यांनी मान्सूनपूर्व कामे करण्याचा आग्रह पालिका प्रशासनाकडे धरला होता; परंतु त्याला प्रतिसाद लाभत नसल्याने त्यांनी चक्क स्वत:च हाती फावडे घेत नाल्या सफाईचे काम सुरू केले आणि शहराच्या जुन्या वस्तीमधील नाली पूर्ण साफ केली. विरेंद्रसिंह ठाकूर हे स्वत: प्रगतशील शेतकरीही आहेत शिवाय सामाजिकतेची ओढही त्यांना असल्याने त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढली आणि केवळ उभे राहून इतरांवर ताशेरे ओढण्यापेक्षा स्वत:च स्वच्छतेबाबत पुढाकार घेत तमाम जनतेसमोर आदर्श निर्माण केला.