शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी चार पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ५३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:32 IST

कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ४४ जणांवर  विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली. गत पाच  दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १४ जून रोजी यामध्ये ४ रुग्णांची भर पडली. कारंजा येथील ४ व्यक्तींचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आले असून, यामध्ये दोन २४ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष व ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्वजण अमरावती येथे १२ जून रोजी कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे कारंजा शहर व तालुक्यात आता एकूण रुग्णसंख्या १३ अशी झाली आहे. जेथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तेथे प्र्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास तसेच बाहेर ठिकाणच्या नागरिकांना प्रतिबंधीत क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात किती जण आले याची माहिती घेण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी सर्वे सुरू करण्यात आला. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.जिल्ह्याची चिंता वाढलीगत पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाने कुणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या