शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : बाहेरगावावरून परतलेल्यांमुळे वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:47 IST

रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते.

वाशिम : विविध कामे तसेच रोजगारानिमित्त परराज्य, परजिल्ह्यात गेलेले नागरीक जिल्ह्यात परतत असून, यापैकी रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. १२ जून रोजी तब्बल १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४२ वर पोहचले आहे. यापैकी ३४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहे. विशेषत: मुंबई भागातून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. या पृष्ठभूमीवर प्रत्येक नागरिकाने आता स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहेमुंबईवरून मालेगावला परतत असताना, एक महिला कोरोनाबाधित असल्याचे १५ मे महिन्यात स्पष्ट झाले होते. बाहेरगावावरून आलेल्या महिलेमुळे जिल्ह्यात सर्वप्रथम १५ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर या महिलेसोबतच प्रवासात असलेले पाच जण कोरोनाबाधित असल्याचे १९ मे रोजी स्पष्ट झाले होते. यापैकी एकाचा मृत्यू तर पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेली ६० वर्षीय महिला तसेच मध्यप्रदेशातून वाशिम येथील रेल्वे स्टेशन चौक परिसरात परतलेल्या युवती, नवी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेली महिला पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर अमरावती येथे कामानिमित्त गेलेला आणि परत बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील आलेला युवक कोरोनाबाधित निघाला. मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षीय बालक, मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव, शेलुबाजार येथे परतलेला एक जणही कोरोनाबाधित निघाला. एकंदरित बाहेरगावावरून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.रिसोड शहरातील ‘तो’ एरिया सीलरिसोड शहरातील एकता नगरात परतलेला ४१ वर्षीय इसम हा दिल्ली येथून आला होता. त्याच्या संपर्कात कुटुंंबातील सदस्याव्यतिरिक्त अन्य कुणी आले नाही, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.४एकता नगर परिसर सील करण्याची कार्यवाही पोलीस व आरोग्य विभागाने शुक्रवारी केली.आतापर्यंत रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा व मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. १२ जून रोजी रिसोड शहर व तालुक्यातील कन्हेरी या गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर वाघ यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या