शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:26 IST

एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल २५ जून रोजी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८६ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरातील स्वराज्य कॉलनी, डाळिंबी विहीर परिसरातील एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल २५ जून रोजी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८६ झाली. यापैकी दोघांचा मृत्यू तर ५८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत २६ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मे महिन्याच्या अखेरपासून परजिल्हा, परराज्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात दाखल झाले. बाहेरगावावरून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होत असल्याचे रुग्णसंख्येवरून दिसून येते. २५ जून रोजी दुपारपर्यंत २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक जण पॉझिटिव्ह तर २२ जण निगेटिव्ह आले. वाशिम शहरातील स्वराज्य कॉलनी, डाळिंबी विहीर परिसरातील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, हा व्यक्ती लाखाळा परिसरातील कोरोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. दरम्यान, २५ जून रोजी हिवरा रोहिला १ व कारंजा येथील पाच अशा सहा जणांनी कोरोनावर मात केली. (प्रतिनिधी)५८ जणांना रुग्णालयातून सुटी४२५ जून रोजी हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एक आणि कारंजा शहरातील पाच आ एकूण सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.४आतापर्यंत एकूण ५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८६ पैकी केवळ दोघांचा मृत्यू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.११०३ पैकी ९८९ अहवाल निगेटिव्ह११०३ पैकी ९८९ अहवाल निगेटिव्ह तर ८४ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ३० अहवालाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याबाहेरच्या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवाल निघालेले; तथापि, जिल्ह्यात उपचार घेतलेले दोन रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८६ अशी आहे. ३० अहवाल काय येतात, याकडे लक्ष लागून आहे.२५ जून रोजी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. गुरूवारी एकूण सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या