शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९५६ वर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:35 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९५६ झाली असून यापैकी ३५९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी २१ रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९५६ झाली असून यापैकी ३५९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. वाशिम व कारंजा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी २१ रुग्णांची भर १० आॅगस्ट रोजी पडली. सलग १० दिवसात ३६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हा आतापर्यंतच सर्वाधिक उच्चांक आहे. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. १० आॅगस्ट रोजी एकूण २१ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सकाळच्या अहवालानुसार, वाशिम शहरातील दंडे चौक येथील १, देगाव येथील २, अनसिंग येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, सुंदरवाटिका परिसरातील १, सोहोळ येथील ४ असे १० जण आढळून आले. सायंकाळी ६.३० वाजताच्या अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसर २, काटीवेश परिसर १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर १, मुठ्ठा १, मानोरा तालुक्यातील गुंडी १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे २ व्यक्ती तसेच अकोला येथे उपचार घेत असलेले वाशिम शहरातील मंगळवार वेस परिसरातील १, धुमका येथील १, रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील १ असे एकूण ११ जण कोरोनाबाधित आढळून आले.

५७८ जणांची कोरोनावर मातसोमवारी एकूण ५९ जणांनी कोरोनावर मात केली. एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याची बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. ९५६ रुग्णांपैकी आतापर्यंत ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार सुरू असलेल्या ३५९ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या