शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ७० हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:50 IST

CoronaVirus vaccine: लस साठवणुकीचे नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात शीतगृह नसून शीत साखळी केंद्रे आहेत.शीतगृहासाठी अकोल्याचा आधार घेतला जातो.एका महिन्याचा साठा वाशिमला मिळणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जानेवारी महिन्यात कोरोना लस येण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर्स यांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ७० हजार लिटर लस साठवणुकीची व्यवस्था आहे. देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून सरकारी  व खासगी क्षेत्रातील जवळपास सहा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. लस साठवणुकीचे नियोजन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात शीतगृह नसून शीत साखळी केंद्रे आहेत. शीतगृहासाठी अकोल्याचा आधार घेतला जातो. अकोला येथील शीतगृहात तीन महिन्यांचा साठा ठेवण्यात येईल. येथून एका महिन्याचा साठा वाशिमला मिळणार आहे. लसीकरण व लस साठवणुकीचे पूर्वनियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.अकोल्यात शीतगृह वाशिम जिल्ह्यासाठी स्वतंत्र शीतगृह नाही. अकोला येथील शीतगृहात वाशिम जिल्ह्यातील लसी व अन्य वैद्यकीय साठा ठेवण्यात येतो. कोरोना लस प्राप्त झाल्यानंतर अकोला येथील शीतगृहात ठेवली जाईल. तेथून जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून मग प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावरील शीत साखळी केंद्रात लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

लस पोहोचविण्यासाठी विशेष वाहनेकोरोना लस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मुख्यालयातून तालुका स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष वाहनांची सोय केली जाणार आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात लस ठेवण्यात येणार आहे. येथून फ्रंट लाइन वर्कर्सला ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सहा हजार फ्रंट लाइन वर्कर्स आहेत.

जिल्ह्यात शीत साखळी केंद्रजिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या सर्व ठिकाणी शीत साखळी केंद्र आहेत. त्याशिवाय ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा स्तरावर शीत साखळी केंद्र असून, येथे साठवणूक केली जाणार आहे.

आगामी काळात कोरोना लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात ३५ शीत साखळी केंद्रे आहेत. अकोला येथे शीतगृह आहे. तेथून जिल्हास्तरावर लस प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर वितरण होईल. - डाॅ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या