वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, मृत्यूसत्र कायम असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली. आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान गुरूवारी दिवसभरात ६१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मात्र, कोरोनाबळींची संख्या वाढत आहे. गुरूवारी दोन जणांचे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली तर एकूण ६१ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील २, आनंदवाडी येथील १, गवळीपुरा येथील १, चंडिकावेस १, सिव्हील लाईन १, पोलीस वसाहत परिसर १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर १, अल्लाडा प्लॉट येथील २, सिंचन वसाहत येथील १, संत नगर परिसर १, काटीवेस येथील १, लाखाळा परिसरातील १, कोकलगाव येथील १, केकतउमरा १, मोठा उमरा २, सुपखेला १, बोरखेडी येथील १, नागठाणा १, रिसोड शहरातील ३, चिचांबा पेन १, कुऱ्हा येथील १, हराळ २, मांगवाडी येथील १, व्याड २, गोभणी २, मसला पेन १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील राजस्थानी चौक येथील १, जनुना १, पार्डी ताड ३, पोघात १, शहापूर येथील १, फाळेगाव १, मालेगाव शहरातील ५, वसारी १, इराळा येथील १, जऊळका ३, कारंजा लाड शहरातील पहाडपुरा १, खेर्डा ३, कामरगाव १, धामणी ३ अशा ६१ जणांचा समावेश आहे. गुरूवारी ४१ जणांना डिस्चार्ज दिला. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५३१ वर पोहचली आहे. यापैकी ४७४७ जण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६१ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:27 IST