शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रिसोडकरांची चिंता वाढली; एकूण रुग्णसंख्या ३०  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:03 IST

१४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार एकूण १२ रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : ११ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या रिसोड शहर व तालुक्यात अलिकडच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये १४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार एकूण १२ रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे. यामध्ये शहरातील २५ आणि ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मार्च, एप्रिल व मे महिन्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ जवळपास ठप्प होती. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून विविध प्रकारची दुकाने सुूरू झाली. रिसोड शहरातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असतानाच, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली. दरम्यान, रिसोड शहरात पहिला रुग्ण १२ जून रोजी आढळून आला होता. त्यानंतर पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता रिसोड शहर कोरोनामुक्त राहिल, असे वाटत असतानाही, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यात १४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार आणखी १० जणांची भर पडली. रिसोड शहरातील १० आणि तालुक्यातील वनोजा येथील दोन अशा एकूण १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या २५ झाली आहे. वनोजा व अंचळ प्रत्येकी दोन आणि भापूर एक असे एकूण पाच रुग्ण ग्रामीण भागात आहेत. हराळ येथील रुग्णाने कोरोनावर मात केली. दरम्यान, मध्यंतरी १४ जून दरम्यान व्यापारी संघटनेने पुढाकार घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चार दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. त्यानंतर बाजारपेठ पूर्ववत झाल्याने नागरिकांची गर्दी वाढली. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेच १५ जुलैपासून सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय दिला आहे. पहिल्याच दिवशी शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Risodरिसोडcorona virusकोरोना वायरस बातम्या