शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्याला दिलासा; आयसोलेशन कक्षात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:56 IST

२९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारार्थ भरती रुग्णांचा आकडा शून्य होता.

ठळक मुद्दे९ मे पासून एकही रुग्ण आढळला नाही. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह नजिकच्या अकोला जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाने वाशिम जिल्ह्यावर मात्र फारसा परिणाम केलेला नाही. आजपर्यंत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला; तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे २९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारार्थ भरती रुग्णांचा आकडा शून्य होता. तसेच १९ मे पासून एकही रुग्ण आढळला नाही. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात वाशिम जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने शासनस्तरावरून आखण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा प्रकोप होऊ शकला नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या १९४ संदिग्ध रुग्णांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; तर १८० अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, आठ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला; तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता प्रलंबित असलेल्या सहा नमुन्यांचा अहवाल काय येतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.सहा जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी रवाना!२९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा ‘कोविड केअर सेंटर’मध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण उपचारार्थ भरती नव्हता. दरम्यान, ३० मे रोजी कोरोना विषाणू संसर्गाच्या सहा संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते अकोला येथील ‘व्हीआरडीएल लॅब’कडे तपासणीसाठी रवाना करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.आज प्राप्त चार अहवाल ‘निगेटिव्ह’प्रयोगशाळेकडे प्रलंबित असलेले यापुर्वीचे चार अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व ‘निगेटिव्ह’ आहेत. त्यामुळे कोरोना ‘पॉझिटिव्ह’च्या बाबतीत जिल्हा सद्यातरी निरंक आहे.

कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी अंमलात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात असल्यानेच परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे गाफील राहू नये.- ह्रषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या