शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आला; इतर आजार कमी झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:06 IST

CoronaVirus in Washim जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणीत (ओपीडी) जवळपास चार लाख ४० हजाराने घट आली.

ठळक मुद्देमार्च ते जुलै यादरम्यान बहुतांश नागरिक हे घराबाहेर पडले नाहीत. आजारांचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमी असल्याचे दिसून येते.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ‘कोरोना’मुळे गतवर्षी लाॅकडाऊन काळात तीन ते चार महिने बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने याचे चांगले परिणाम समोर येत असून, २०१९ च्या तुलनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणीत (ओपीडी) जवळपास चार लाख ४० हजाराने घट आली. २०२० मध्ये कोरोना आला आणि अन्य आजारांचे प्रमाण कमी झाले, असे दिसून येते.२०२० मध्ये मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्चपासून लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. जुलै महिन्यापर्यंत लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. त्यानंतर अनलाॅकचे टप्पे सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक हे सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे उपचारार्थ धाव घेतात. सन २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीचा आकडा (ओपीडी) चार लाख ९८ हजार ७८१ असा हाेता. २०१९ मध्ये बाह्यरुग्ण तपासणी ही सहा लाख सहा हजार ४४७  होती तर २०२० मध्ये एक लाख ६० हजार ७९० पर्यंत तपासणीचा आकडा खाली आला. कोरोनाकाळात मार्च ते जुलै यादरम्यान बहुतांश नागरिक हे घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे सर्दी, ताप, जलजन्य आजार, हिवताप, डेंग्यू आदी आजारांचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमी असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या भीतीने सरकारी रुग्णालयांत येणे टाळलेदेशात मार्च महिन्यापासून तर जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी सरकारी रुग्णालयात येण्याचे टाळले. दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरातच असल्याने ताप, हिवताप, डेंग्यू व अन्य साथरोगांचे प्रमाणही घटले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या