शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कवठळ येथे घरोघरी सर्वेक्षण; नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:56 IST

कवठळ येथे आरोग्य विभागातर्फे नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने ११ मे रोजी जवळपास २०० कुटुंबाचे सर्वेक्षण केले. हाय रिस्क संपर्कातील सात ते आठ जण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून, कवठळ येथे आरोग्य विभागातर्फे नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. अमरावती विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे.  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईवरून नागपूरकडे जाणाºया एका ट्रक क्लिनरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ३ मे रोजी स्पष्ट झाले होते. त्या क्लिनरच्या संपर्कातील चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला असून, सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील  एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील  सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सदर रुग्ण ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने सतर्क होत आरोग्य विभागाची चमू १० मे रोजी कवठळ येथे दाखल झाले. ११ मे पासून घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, दुपारी २ वाजेपर्यंत २०० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. हायरिस्क संपर्कातील सात ते आठ जण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत. प्राथमिक टप्प्यात कवठळ येथील काही नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या कुटुंबातील सदस्य गावातील किती जणांच्या संपर्कात आले याची माहिती ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे.  सुरक्षिततेचा उपाय म्हणून कवठळ गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. तीन संदिग्ध रुग्णरिसोड तालुक्यातील एक व कारंजा तालुक्यातील दोन असे तीन संदिग्ध रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात कोण, कोण आले, याची माहिती घेतली जात आहे.