शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी ४१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:33 IST

कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२२७ झाली असून यापैकी ३८८ जण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२२७ झाली असून यापैकी ३८८ जण अ‍ॅक्टिव्ह आहेत.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी ४१ रुग्णांची भर पडली. मे महिन्यापर्यंत जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रित होती. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. १६ आॅगस्ट रोजी रात्री उशिराच्या अहवालानुसार २५ व १७ आॅगस्ट रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी ३ व्यक्ती असे २८ जण कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये वाशिम शहरातील जैन मंदिर परिसर, दंडे चौक येथील १, शिंपी गल्ली परिसर १, सुंदरवाटिका १, परळकर चौक १, लाखाळा परिसर ६, अनसिंग २, कोल्ही येथील २, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसर ३, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन परिसर १, मांडवा १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर २, संभाजी नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.रात्री ७ वाजताच्या अहवालानुसार १३ जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील चंडिका वेस परिसर १, गुरुवार बाजार परिसर १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसर १, कोल्ही २, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगरी परिसर १, शिवणी २, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसर २, सवड १, बेलखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.३९ जणांची कोरोनावर मात !सोमवारी ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. १२२७ पैकी आतापर्यंत ८१९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या