शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :  वाशिम जिल्ह्याचा मृत्यूदर ०.२२ टक्क्यांवर कायम! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 10:07 IST

Corona Virus: मृत्युदरही ०.२२ टक्क्यांच्या आसपास असल्याने जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर बऱ्याच प्रमाणात मंदावला असून, मृत्युदरही ०.२० टक्के टक्क्यांवर कायम असल्याचे जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे.जिल्ह्यात मेडशी (ता.मालेगाव) येथे ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. जिल्ह्यात मे महिन्यात पहिला कोरोनाबळी गेला होता. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. सप्टेंबर महिन्यात खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. एकट्या सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ६१ जणांचा कोरोनामुळे मत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत गत तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग बऱ्याच प्रमाणात मंदावला आहे. दुसरीकडे मृत्युदरही ०.२२ टक्क्यांच्या आसपास असल्याने जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात मृत्युदर २.३० टक्क्याच्या आसपास होता. ऑक्टोबर महिन्यातही जिल्ह्यात मृत्युसत्र सुरूच होते. या महिन्यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाबळींची संख्या खाली आल्याने जिल्हावासीयांना काही अंशी दिलासा मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ब्रिटनहून जिल्ह्यात परतलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे मध्यंतरी चिंता वाढली होती. या रुग्णाच्या संपर्कातील दोन्ही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तसेच ब्रिटनहून परतलेल्या अन्य सहा जणांचे अहवालही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता कमी झाल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजी न राहता आरोग्याची काळजी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे आदी लक्षणे दिसून येताच, नागरिकांनी कोरोना चाचणी करावी. तीव्र लक्षणे दिसून येताच रुग्णालयात दाखल होऊन योग्य उपचार घ्यावेत. अंगावर दुखणे काढू नये. कोरोनामुळे फुफ्फुसांवर घातक परिणाम होत असल्याने नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. - डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या