शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता रात्री नऊपर्यंत मिळणार कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:08 IST

Corona Vaccination : विशेष म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेस गती मिळावी, यासाठी आता दोन पाळीत लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. त्यासाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार ८०२ पुरुष आणि १ लाख ६१ हजार २७३ महिला अशा एकूण ३ लाख ४५ हजार ७५ जणांचे लसीकरण झालेले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ६४ हजार ३५४; तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८० हजार ७२१ इतकी आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेस गती मिळावी, यासाठी आरोग्य विभागाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता यापुढे दोन पाळीत लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजता अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहे. यासाठी नियोजन करून आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. 

शेतकरी, शेतमजुरांच्या लसीकरणावर भरसध्या खरीप हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील बहुतांश लोक दिवसभर शेतामध्ये कामात व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यामाध्यमातून विशेषत: शेतकरी व शेतमजुरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे.  

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत २ लाख ६४ हजार ३५४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे; तर ८० हजार ७२१ जणांनी दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित केले आहे. १ लाख ८३ हजार ६३३ जणांना लसीचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे.- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला