शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कारणामुळे कोरोना लसीकरण दोन दिवस लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:53 IST

Corona Vaccine News लसीकरण मोहीम १९ जानेवारीपासून पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारीला झाला असून, तांत्रिक कारणामुळे रविवार व सोमवार या दोन दिवशी लसीकरण होणार नाही. १८ जानेवारीला वरिष्ठ स्तरावरून ‘व्हिडिओ काॅन्फरन्स’ झाल्यानंतर लसीकरण मोहीम १९ जानेवारीपासून पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीला जिल्ह्यात वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रात प्रत्येकी १०० असे एकूण ३०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन होते. परंतु, प्रत्यक्षात १६७ जणांनाच लस देण्यात आली. काहीजण नियोजित ठिकाणी हजर होऊ शकले नाहीत, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण मोहिमेत व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, रविवार, १७ जानेवारी रोजीदेखील तांत्रिक अडचण दूर झाली नाही. कोविन ॲप आणि अन्य आनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहीम लांबणीवर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.  तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने दोन दिवस (दि.१७ व १८ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी ‘व्हीसी’ होणार आहे. तांत्रिक समस्या निर्माण होणे, हा प्रश्न सर्वत्रच असून, १९ जानेवारीपासून मोहिम पूर्ववत होइल.- डाॅ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम