शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक सर्रास ठिकाणी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:47 IST

Washim News : चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात एकीकडे माणुसकीचा परिचय देत समाजातील अनेक सद्गृहस्थ मदतीसाठी पुढे येत आहेत तर दुसरीकडे काहीजण संधी साधत रुग्णांसह नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यातही मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर येत आहे. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या चाचण्यांचा सल्ला दिला जातो. या चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते.वातावरणातील बदलामुळे साथरोग उद्भवत असून सर्दी, ताप, खोकला असल्यास विविध प्रकारच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. विषाणू संसर्गाचे प्रमाण नेमके किती आहे, याबाबतही काही चाचण्यांचा सल्ला दिला जातो. सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी आदी स्वरुपांतील चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये एकसमान असणे अपेक्षित आहे. बुधवारी चार ते पाच ठिकाणी पाहणी केली असता, या दरामध्ये तफावत असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते. पॅथालॉजी लॅबमध्ये दर्शनीभागात दरपत्रक लावले जात नाही तसेच अधिकृत पावतीदेखील दिली जात नाही. याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याचा सूर उमटत आहे.

एजंटांची टक्केवारी वेगळीचअधिकाधिक रुग्णांचे चाचणी नमुने तपासणीसाठी मिळावे यासाठी पॅथॉलॉजी लॅब संचालकांमध्येदेखील स्पर्धा असल्याचे पाहावयास मिळते. काही दवाखान्यांच्या परिसरात काही एजंट असून, टक्केवारीच्या मोबदल्यात ते या व्यवसायात जम बसवून असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. एका चाचणीसाठी २० ते ३० टक्के कमिशन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक चाचणीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. एजंटांच्या या टक्केवारीत रुग्ण व नातेवाईकांची मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.

नियंत्रणच नाही; लूट सुरूपॅथॉलॅॉजी लॅबमध्ये दरपत्रक नाही, पावती दिली जात नसल्याचे सर्वश्रूत असतानाही आरोग्य विभाग किंवा तालुका, जिल्हा प्रशासनाच्या चमूकडून पाहणी केली जात नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची लूट सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन प्रत्येक चाचणीचे दर किती याबाबत दर्शनीभागात दरपत्रक लावण्याचे निर्देश तर रुग्णांची लूट थांबेल, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या