कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, त्यात येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांची होणारी गर्दी व त्यातून कोरोना संसर्गाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कामरगाव येथील मुलांच्या शाळेत तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशानुसार १२ जानेवारीला कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह प्रतिनिधी मिळून २५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. या शिबिरात कामरगाव, लाडेगाव, बेंबळा, पिंप्रीमोडक, शिरसोली व खेर्डा बु. या गावांतील उमेदवार व प्रतिनिधींनी आपली कोरोना तपासणी करून घेतली. कामरगाव परिसरातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना कारंजा येथे तपासणीसाठी जावे लागत होते. त्यांचा हा त्रास वाचविण्यासाठी कामरगावात कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले.
===Photopath===
120121\12wsm_6_12012021_35.jpg
===Caption===
कामरगावात उमेदवार, प्रतिनिधींसाठी कोरोना चाचणी शिबीर