शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सीमेवरही होणार कोरोना चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदी असून, अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश ...

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदी असून, अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संबंधित यंत्रणेला शुक्रवारी दिले.

राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. जिल्हाबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, अत्यावश्यक कारणांमुळे इ-पास असणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. जिल्हा शेजारी असणाऱ्या प्रत्येकच जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश देताना सीमेवरच कोरोना चाचणी केली, तर संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात टाळला जाऊ शकतो. या अनुषंगाने जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्हा सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. परजिल्ह्यातील प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू नयेत म्हणून संदिग्ध रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्यांना कोविड केअर सेंटर किंवा १४ दिवसांसाठी गृहविलगीकरणात ठेवले जाणार आहे.

०००

कोट

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच जिल्हा सीमेवरदेखील कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत.

- शण्मुगराजन एस.,

जिल्हाधिकारी, वाशिम.