शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:41 IST

Corona Virus New : बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने अनेकांना दु:खद धक्के दिले. कुणाचा भाऊ/बहिणी हिरावले, कुणाचे बाबा, कुणाचे आजी/आजोबा तर कुणाची आई हिरावली. आईविना बालकांच्या पालनपोषणाची कल्पनाही करता येत नाही. आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ बालकांची आई कोरोनाने हिरावली असून, या बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. मार्च ते मे या तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. याच तीन महिन्यांत अनेकांना परिवारातील सदस्यही गमवावे लागले. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविली आहे. कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली. घरातील कर्ता पुरुष म्हणून वडिलांचा मृत्यू झाला असल्यास बालकांसाठी बाल संगोपन योजना व विधवा महिलासाठी निराधार योजनेतून लाभ दिला जातो. आईचा मृत्यू झाल्यास बालकासाठी बालसंगोपन योजनेचा लाभ लागू होऊ शकतो. परंतु, पुरुषाला अर्थसाहाय्य देणारी अन्य शासकीय योजना नाही. दुसरीकडे आईचा मृत्यू झाल्याने बालकाच्या पालनपोषण, संगोपनाचा, भावनिक जिव्हाळ्याचा प्रश्नही समोर येत आहे. कोरोनाने जिल्ह्यातील २३ बालकांची आई हिरावली आहे. आईविना या बालकांचे मायेचे छत्र हरविले असून, पालनपोषण करताना बाबांना मोठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनामुळे आई-बाबा असे दोन्ही पालक किंवा एक पालक हिरावलेल्या बालकांचा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील २३ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय निकषानुसार या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.- सुभाष राठोडजिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या