शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू;  ८९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 12:03 IST

Corona Cases in Washim: शनिवार  ५ जून रोजी आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबळींची संख्याही कमी होत असल्याचे दिसून येते. शनिवार  ५ जून रोजी आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०५२८ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे; तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. शनिवारी नव्याने ८९ रुग्ण आढळून आले, तर ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे. मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळून आला नसल्याची नोंद शनिवारच्या अहवालात घेण्यात आली. सर्वात कमी रुग्ण मालेगाव तालुक्यात आढळून आले. आतापर्यंत कोरोनामुळे ५९० जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले. मालेगाव शहर निरंकशहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. शनिवारच्या अहवालानुसार मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळला नाही, तर ग्रामीण भागात चार रुग्ण आढळून आले. वाशिम शहरात सात, तर ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात तीन, तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळून आले. याप्रमाणेच कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या